Friday 27 February 2015

भारत स्वच्छता अभियान


                   आज सध्या देशात स्वच्छता अभियाना बद्दल चर्चा सुरु आहे. चांगली गोष्ट आहे आणि त्यावर चर्चा ही व्हायला पाहिजे. कारण चर्चाच होणार नाही निष्कर्ष सुद्धा निघणार नाही. असो मुद्दा हा आहे की स्वच्छता कोणी करायची व् कोठे करायची. आज मोठे मोठे नेते हातात झाड़ू घेऊन फ़क्त फोटो काढून मिडियाचे लक्ष वेधून घायचे येवढ काम करीत आहे. अभियान सुरु होऊन जवळ पास ५-६ महिने लोटून गेले परंतू देश स्वच्छ झाला नाही. आणि होणार ही नाही त्याला अनेक कारण आपल्या देशात आहे.             

                 आपल्या देशातील लोकांना घाणेची येवढी सवय आहे की ते साधा आपल्या घरासमोरील कचरा किंव्हा घाण उचलत नाही. ते आपले काम नाही. ते उचलण्याची जवाबदारी नगरपलिकेची आहे हे समजून कळत नळत त्याकडे दूरलक्ष करतात वेळ पडल्यास त्यावर पाय देतात त्याच पावलाने घरात प्रवेश देखिल करतात. परंतू जेंव्हा आपल्या घराचा प्रश्न येतो तेंव्हा सारेच आप आपले घर साफ़ करतात. परंतू सांगायचे तात्पर्य येवढे की सर्वाना देश स्वच्छ हवा आहे. परंतू तो स्वच्छ होणार कसा त्याची खरी सुरवात आपल्याच घरुन होणार आहे हे आपण सर्वानि लक्षात ठेवले पाहिजे. कारण जो पर्यंत आपण सर्व आप आले घर व् आजुबाजुचा परिसर स्वच्छ करणार नाही तो पर्यंत आपले शहर स्वच्छ होणार. व् शहर स्वच्छ होणार तो पर्यंत आपला देश देखिल स्वच्छ होणार नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या घरासमोरील परिसर स्वच्छ करण्याची जवाबदारी आमची नाही असे. समजून चालणार नाही. ही आपली सर्वांची सामुहिक जवाबदारी आहे.                

               जर आपल्याला आपला देश इतर देशाप्रमाने स्वच्छ पाहिजे असेल तर त्याकरिता आपल्याला आपल्या घरासमोरील स्वच्छता राखाविच लागेल. असे जर सर्वानी ठरविले तर देश स्वच्छ होण्यास जास्त वेळ लागणार नाही. याच संकल्पतेतुन गांधीजीनी स्वच्छतेची संकल्पना मांडली होती. व् आता आपले पंतप्रधान श्री मोदी यांनी सुधा हीच संकल्पना आज मांडली. अति सुंदर व् अति आवश्यक योजना असून त्या करीता सर्वानी यात मदत केलीच पाहिजे. याचा फायदा आम्हालाच होणार आहे. कारण अनेक आहेत आजुबाजुला जर स्वच्छता राहली तर रोगराई आपल्या आजुबाजुला सुधा भटकत नाही त्यामुळे आजारावर होणारा अन-आवश्यक खर्च देखिल वाचणार आहे. व् आपला परिवार देखिल निरोगी राहिल. तर चला आजपासूनच स्वच्छता अभियानात भाग घेऊ व् आपला परिसर स्वच्छ करू. व् या निमित्याने देश स्वच्छ करू.

जितेन्द्र श. खोत